स्वावलंबन कौशल्य सेवा फाऊंडेशन

नोंदणी :

संपर्क : 9898989898

आमचे कार्यक्षेत्र

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे उपक्रम

समाजातील वंचित, गरजू आणि विविध घटकांना कौशल्य, प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था विविध उपक्रमांवर कार्यरत आहे.

दिव्यांग सक्षमीकरण

दिव्यांग व्यक्तींना कौशल्य प्रशिक्षण, घरगुती उद्योग आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न.

महिला आर्थिक सक्षमीकरण

महिला व बचत गटांना उत्पादन प्रशिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन आणि आर्थिक स्वावलंबनासाठी प्रोत्साहन.

युवक कौशल्य विकास

डिजिटल मार्केटिंग, व्यवसाय व्यवस्थापन आणि उद्योजकता विकासासाठी मार्गदर्शन.

लघुउद्योग व स्वयंरोजगार

Fringilla in sed diam nam mauris eros nisl gravida sollicitudin

शासकीय योजना सहाय्य

UDID कार्ड, ऑनलाइन नोंदणी आणि पात्र शासकीय योजनांच्या अर्ज प्रक्रियेसाठी मार्गदर्शन.

ग्रामपंचायत व संस्थात्मक सहकार्य

गावपातळीवर प्रशिक्षण कार्यक्रम, महिला बचत गट आणि रोजगाराभिमुख उपक्रमांसाठी समन्वय.

विशेष उपक्रम

दिव्यांग व्यक्तींसाठी कौशल्य प्रशिक्षण व रोजगार निर्मिती

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण, उत्पादन निर्मिती आणि स्वयंरोजगाराच्या संधी विकसित करण्यावर संस्थेचा विशेष भर आहे.

कौशल्य प्रशिक्षणातून स्वावलंबनाकडे

दिव्यांग व्यक्ती, महिला आणि ग्रामीण युवकांना त्यांच्या क्षमतेनुसार रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी संस्था विविध कौशल्याधारित उपक्रम राबविण्याच्या दिशेने कार्य करीत आहे.

मोप निर्मिती, LED बल्ब निर्मिती, स्क्रबर व इतर घरगुती उपयोगाच्या वस्तूंचे उत्पादन यांसारख्या उपक्रमांतून स्वयंरोजगाराच्या संधी विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आमच्या उपक्रमांची छायाचित्रे

कौशल्य प्रशिक्षण, सामाजिक सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीशी संबंधित उपक्रमांची काही क्षणचित्रे.

उपक्रमात सहभागी व्हा

तुमचे सहकार्य, कोणाच्या तरी स्वावलंबनाची सुरुवात!

दिव्यांग व्यक्ती, महिला आणि युवकांच्या कौशल्य विकासासाठी तुमचा सहभाग मोलाचा ठरू शकतो.

आम्हाला सहकार्य करण्याचे मार्ग

आर्थिक व वस्तुरूप सहकार्य

प्रशिक्षणासाठी सहकार्य

रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे

स्वयंसेवक म्हणून सहभागी होणे

तुमचा सहभाग, आमची ताकद

चला, एकत्रितपणे घडवूया स्वावलंबी समाज!

तुमची संस्था, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था किंवा तुम्ही स्वतः कौशल्य प्रशिक्षण व रोजगार निर्मितीच्या सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता. आपल्या सहकार्याने अनेकांना नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात.